म्युच्युअल फंड ही एक अशी गुंतवणूक संकल्पना आहे, जी सामान्य माणसालाही सहज समजेल, त्याच्या गरजांनुसार लवचिकता देईल आणि योग्य मार्गदर्शनासह आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकेल. मात्र यासाठी त्या संकल्पनेचा पाया समजून घेणे आवश्यक आहे.
हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे — "बदलत्या काळाची गुंतवणूक – म्युच्युअल फंड".
या पुस्तकात म्युच्युअल फंडची मूलभूत माहिती, त्यातील विविध योजना, गुंतवणुकीतील धोके आणि संधी, तसेच आर्थिक नियोजनासाठी लागणारे अनेक पैलू सविस्तर, सोप्या भाषेत, संवादात्मक पद्धतीने मांडले आहेत. पुस्तक वाचताना वाचकाला गुंतवणुकीचा केवळ सैद्धांतिक नव्हे, तर व्यावहारिक अनुभव मिळेल, असा प्रयत्न आहे.
हे पुस्तक तयार करताना मला अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि प्रोत्साहन लाभले. विशेषतः मुरुड-जंजिरा येथील जनतेने दिलेली प्रेरणा, आणि अनेक ठिकाणी घेतलेल्या आर्थिक साक्षरतेच्या उपक्रमांनी या विचारांना आकार दिला.
हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचे संकलन नाही, तर आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
माझी नम्र अपेक्षा आहे की हे पुस्तक वाचकांच्या आर्थिक ज्ञानात भर घालेल, त्यांना सुजाण गुंतवणूकदार बनवेल आणि आपल्या समाजात आर्थिक साक्षरतेचा दीप अधिक तेजस्वीपणे उजळेल.
📲 For Support, WhatsApp on: 8082349822